Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी.

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी.

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या SITकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने अशोक खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांचे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात याने आता स्वत:चं भविष्य सांगितलं आहे. त्याने आपल्या मृत्यूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पोलीस चौकशीत त्याने हतबल होऊन प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असं वाटत नाही. माझं मरणं इथेच (जेलमध्ये) आहे’ असे वक्तव्य खरात याने केले आहे. तसेच त्याने विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत खरात याने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अशोक खरात याने नागरिकांच्या भोळसट श्रद्धेचा गैरवापर करून त्याने केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांचा ससेमिरा वाढल्यानंतर खरातने गुन्ह्यांची कबुली देत आता सुटका होणं शक्य नसल्याचे मान्य केले आहे. धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषणाचे त्याच्यावर सर्वात गंभीर आरोप आहेत. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, ‘आध्यात्मिक शक्ती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. याव्यतिरिक्त, त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक नवीन तक्रारदार समोर येत असून, तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात देखील कारवाईचे पाऊल उचललं आहे. पोलिसांनी फरार असलेल्या कल्पना खरात हिचे एक बँक खाते ईडी कडून सील करण्यात आले आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षापासूनच्या व्यवहारांची इडीकडून पडताळणी केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka