Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली.

बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली.

चंदीगड (हरियाणा): राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही वेळातच गुरमेल सिंह (वय २३, हरियाणा), धर्मराज कश्यप (वय १९, उत्तर प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली.

गुरमेल हा कैथल जिल्ह्यातील नरड गावातील आहे. गुरमेलवर आधीच गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आहे. गुरमेल सिंहच्या आजीने त्याच्या गुन्हेगारी कृत्याची कुंडलीच सांगितली.

बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्थाही मिळाली होती. बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (ता. १२) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मागील काही दिवसापासून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी संधीची वाट पाहत होते. अखेर रात्री आरोपीकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी मागील काही दिवसापासून कुर्ला परिसरात वास्तव्यास होते

गुरमेल सिंहवर 2019 मध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. याच आरोपात तो कॅथल येथील तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटल्यानंतर गुरमेल सिंह याने मुंबई गाठली. तुरुंगवासाच्या कार्यकाळात त्याचा संबंध हा बिश्नोई गँगमधील गुंडांशी आला. गुरमेल सिंहच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. मागील काही वर्षांपासून तो आपल्या गावी आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

गुरमेलच्या आजीने पोलिसांना त्याच्याबाबत माहिती दिली आहे. गुरमेलच्या आजीचे नाव फूली देवी आहे. गुरमेलचा एक छोटा सावत्र भाऊ देखील आहे. हा सावत्र भाऊ आजीसोबत राहतो. गुरमेलने 2019 मध्ये आपल्या मोठ्या भावाची हत्या केली होती. अनेक वर्षांपूर्वी गुरमेल बलजीत सिंह याला घरातून हाकलून दिले होते. जेव्हापासून आम्ही त्याला घराबाहेर काढले तेव्हापासून त्याच्या कोणत्याही कामाशी आमचा काहीही संबंध नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

गुरमेलची आजी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली, ‘तुम्ही त्याला मारा किंवा सोडून द्या, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्याचा कोणताही पत्ता नव्हता. तेव्हापासून त्याचा ना फोन आला ना तो घरी आला. घरात फक्त एका नातवासोबत राहते.’

दरम्यान, गुरमेल कैथल तुरुंगातच लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे.दीड ते दोन महिने मुंबईत राहून आरोपींनी त्याच्या साथीदारांसह बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची चाचपणी केली होती. सध्या मुंबई गुन्हे शाखेची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

The post बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka