ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे.
शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदे याच्यावर आहे, मात्र या प्रकरणात त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला फसवलं जात असल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलाची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करण्यात यावी, ज्यामुळे तो निर्दोष असल्याचे समोर येऊ शकते, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
'अक्षय 23-24 वर्षांचा आहे. तो असे करू शकत नाही. तो आधी माझ्यासोबत सोसायटीची कामं करायचा. त्याने गुन्हा केला असेल तर माझ्यासमोर त्याला फाशी दिली तरी चालेल, पण माझा मुलगा असे काही करणार नाही, यावर मला विश्वास आहे. मी पण तिकडेच झाडू मारायच्या कामाला आहे. अक्षय दहावी नापास आहे. तो असे काही करू शकत नाही. माझा लहान मुलगा शाळेत काम करायचा त्याला शाळेत शिपाई करून घेतले. मोठा मुलगा करणार नाही म्हणत होता, पण मी कर म्हणाले. सोसायटीची कामं करत होता. त्याचा पाय दुखायचा. तुला एकाच ठिकाणी बाथरूम साफ करायचे आहे. आपलं काम झालं की तिकडे जाऊन बसायचं आहे, म्हणून त्याला कामाला लावले,' असे अक्षय याच्या आईने म्हटले आहे.
The post बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

