Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप.

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा खळबळजनक दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला आहे.

बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरले होते. शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा दावा केला. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षय याने काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी केली आहे.

आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वच्या खरवई गावातला रहिवासी आहे. त्याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अक्षयचे नातेवाईकही याच चाळीत राहतात. गावकऱ्यांनी त्यांच्याही घराची तोडफोड केली आहे. अक्षयचं कुटुंब हे सध्या गावातून पळून गेले आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयची तीन लग्न झाली होती. पण त्याची एकही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नसल्याचे शेजाऱ्यानं सांगितले. आरोपी अक्षय शिंदे हा मुळचा कर्नाटक गुलबर्गा येथील असून तिथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही अक्षयच्या कृत्याचा सामना करावा लागला. गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, भितीनं अक्षयचं कुटुंब तिथून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.

The post बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka