Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू.

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू.

ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली.

जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीला गुरुवारी रात्री अंदाजे 9:50 सुमारास आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. या हॉटेललाच सर्वप्रथम ही आग लागली. त्यानंतर काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिथे एक कपड्याचे दुकाने होते, ते देखील या आगीत जळून खाक झाले आहे. आग लागल्याचं लक्षात येताच 75 नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र ज्यांना बाहेर पडता आले नाही, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.

आरोग्यमंत्री सेन यांनी सांगितले की, ‘या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेल्या 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे शेख हसीना नॅशनल इंस्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दहा जणांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले आहे. या घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, मृतांचा आकडा वाढू शकतो.’

Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka