Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती.

भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती.

नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे.

एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागले आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून, यामुळे खरातच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरात याचे सर्व कारनामे उघड केले आहेत. आता या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी (SIT) पुन्हा एकदा खरात याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून SIT कडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. आधी प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता 'काही आठवत नाही' असे सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीही डोकेदुखी आणि प्रकृती अस्वस्थ असल्याचा बहाणा करत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka