भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडणांचे रुपांतर वादात झाले. संतापलेल्या आशिषने अश्विनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आशिष बावनकुळे याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, सख्या भावाने बहिणीचा खून केल्याची घटना परिसरात समजल्यानंतर खळबळ उडाली आहे.
The post भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

