मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना फ्रॉड कॉल आला होता. मात्र, वेळीच सावध होऊन त्यांनी फ्रॉडने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले नाही, त्यात त्यांचा आयफोन महत्त्वाचा ठरला. आयफोन असल्याने संबंधित एपीके फाईल क्लिक होऊन ओपन झाली नसल्याचेही ऐश्वर्या नारकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना याचा फटका बसत आहे. सतर्कतेमुळे काही जण आर्थिक भुर्दंड बसण्यापासून बचावले आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये याबाब तक्रारीही दाखल आहेत. आपल्या गॅसचे पैसे थकीत असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीस पैसे भरायला सांगितले जाते. तसेच, पैसे न भरल्यास गॅस लाईन कट होण्याची भीती दाखवली जाते. आरोपीकडून एक लिंक पाठवून ती क्लिक करण्यास सांगितली जाते. त्या लिंकवर जाताच कार्ड नंबर आणि पिन मागितला जातो, काही वेळाने खात्यातून पैसे वजा होतात, असा हा स्कॅमचा प्रकार आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, जुहू, अणूशक्ती नगर, अंधेरी या भागांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच, आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही घडल्या प्रकाराची माहिती देत सर्वांना अलर्ट केले आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले की, 'देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले, म्हणून हा व्हिडिओ बनवून मी सर्वांना अलर्ट करत आहे. 4-5 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता, महानगर गॅसच्या नावाने हा मेसेज होता की, तुमच्याकडे गॅसचे बिल पेंडिंग आहे. मात्र, मी आत्तापर्यंतची सगळी बिलं दिली आहेत. तरीही त्यांनी एपीके फाईल पाठवून मला क्लिक करण्यासाठी त्यांनी आग्रह केला होता. मात्र, मी आयफोन फोन वापरत असल्याने ती फाईल क्लिक होतच नव्हती. त्यावेळी, संबंधितांनी मला तुमचा फोन कुठला आहे, तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत नाही का? अँड्रॉईड फोनवरुन लिंक क्लिक करा, असा मेसेज मला केल्यानंतर मी सावध झाले.'दरम्यान, अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले की, एक दिवस त्याला गॅस कनेक्शन बिल भरलं नसल्याचा मेसेज आला. त्यानं पोस्टमध्ये फोनची व्हॉइस रेकॉर्डींगही ऐकवली. त्यात फोन करणारी व्यक्ती म्हणतेय की, जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरलेलं नाही. तुमचं बिल अपडेट दिसत नाही. व्हॉटस् अॅपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही तर पुढच्या 30 मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील, असं सांगितलं. पण, जागरुक असल्यामुळे हा फोन म्हणजे, स्कॅमचा प्रकार असल्याचं चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यामुळे तिनं फोन न ठेवता त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…
पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…

