Dailyhunt
धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ.

धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ.

बारामती : मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक म्हणजे आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ निघाला आहे.

शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यु ट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. याबाबत त्या मुलीच्या मैत्रिणींनी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र टिंगरे यांच्याशी संपर्क साधला. टिंगरे यांनी संपूर्ण प्रकरण पाहून तात्काळ बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरवातीला करण्यात आल. परंतु, त्याने मोबाईल स्विच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. पण आरोपी सकाळी सात पासून मुलीला ब्लॅकमेल करून भेटायला बोलवत होता. त्यानंतर घाबरलेल्या मुलीसोबतच्या मैत्रिणीनीं, सामाजिक कार्यकर्ते टिंगरे यांनी प्लॅन केला. त्या आरोपीला मुलगी घाबरली आहे, ती भेटायला तयार असल्याचे भासवले. त्यावर आरोपीने तिला शाहू हायस्कुल समोर भेटायला बोलावले. तसेच परत पुढे पाटस रस्ता येथे आरोपीने येण्यास सांगितले.

बारामती शहर पोलिस चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांना मदत मागण्यात आली.त्यानंतर त्यावेळी अवघ्या दहा मिनिटाच्या आत गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी हजर झाले. सर्वांनी मिळून आरोपी पर्यंत पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपी हा मुलीचा सख्खा मावस भाऊ निघाला. दरम्यान मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत तिने तक्रार करू नये म्हणून दाबाब आणण्यात आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे.

मुलींच्या मदतीची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी त्यांचा सत्कार केला. मुलीच्या मैत्रिणी, सामाजिक कार्यकर्ते, व पोलिसांच्या कर्तव्यामुळे मोठा गुन्हा टळला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने पीडित महिलेकडे केली शरिरसुखाची मागणी…

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…

भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…

पुणे शहरात वरिष्ठ व्यवस्थापक महिलेला म्हणाला, फक्त एक 'किस' दे अन् पुढे…

The post धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka