मुंबई: उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी (वय 22) याला प्रेयसीने भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी युवतीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडी पोलिस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ, तानसा पाईप लाईन शेजारील रस्त्यावर 17 जानेवारी रोजी अक्रम इकबालुद्दीन कुरेशी (वय 22, रा. जोगेश्वरी, मुंबई) या ओला चालकाची गाडी भाडे घेऊन आले असता अज्ञाताने लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी अज्ञाता विरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये मृत युवक हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला. पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिलेकडे केलेल्या तपासात मोहमंद कैफ मोहंमद रफिक कुरेशी (वय 22), इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी (वय 35), सलमान मो. शफिक खान (वय 32), सुहेल अहमद कुरेशी (वय 28 वर्षे, सर्व रा. मौजे हैदरपुर, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचे आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता.
आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली. तिने मृत अक्रम कुरेशी याच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी भिवंडी येथे बोलावले. हत्या करण्याच्या नियोजित स्थळी ती त्याच्या सोबत कारमध्ये बसून गेली. त्याठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला चढवत त्याची निर्घृणपणे हत्या केली. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस करीत आहे.
पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार…
प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर…
पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…
धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…
The post धक्कादायक! बदला घेण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केली निर्घृणपणे हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

