Dailyhunt
धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली.

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली.

वतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १९) रात्री घडली आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सासू मात्र वाचली आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी आरोपी गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे.

जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले, पत्नी रेखा गोविंद पवार यांचा मृत्यू झाला आहे. सासू रुखमा पंडित घोसले या गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपी गोविंद विरचंद पवार हा काही महिन्यांपूर्वी पत्नी रेखा सोबत सासुरवाडीत राहत होता. त्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे आणि पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून गोविंदने मंगळवारी मध्यरात्री संपूर्ण घरावरच सूड उगवला. तिरझडा गावात घरी झोपलेल्या पत्नी आणि मेहुण्याची हत्या केली. नंतर शेतात झोपलेल्या सासरा आणि दुसरा मेहुण्यावर हल्ला केला. यावेळी सासू थोडक्यात बचावली. मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

आरोपी गोविंद हा तिच्या पत्नीला मारहाण करत असल्याच्या कारणावरून सासरा पंडित घोसले आणि मेहुण्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर मात्र सगळं काही व्यवस्थित झाल्याचं चित्र असताना एका महिन्यानंतर गोविंदने त्याचा बदला घेतला आहे. जखमी सासू रुखमा पंडित घोसले यांची साक्ष कळंब पोलिसांनी नोंदविली आहे. यात त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर माडल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूजलवार यांनी सांगितले. साक्षीनुसार गुन्हाही नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…

धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…

धक्कादायक Video: पोलिस अधिकाऱ्यामुळे महिलेला गमवावा लागला जीव….

धक्कादायक Video: युवकाला ६० वेळा भोसकले अन् मृतदेहासमोर नाचलाही…

धक्कादायक! पती-पत्नीने एकाच खोलीतून घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka