Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

कोलकता (पश्चिम बंगाल): विवाह सोहळा उत्साहात पार पडला होता. पण, लग्नानंतर सातव्या दिवशीच नवरीने प्रियकरासोबत पळ काढला. धक्कादायक म्हणजे पळून जाताना तिच्या प्रियकराने युवतीच्या वडिलांची कारने चिरडून हत्या केली.

बीरभूम येथील बोलपूरमधील यज्ञनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुद्दुस शेखची मुलगी कुतबा खातून हिचे त्याच गावातील गजू शेख याच्याशी प्रेमसंबंध होते. पण कुद्दुस यांना त्या दोघांचे नातं मान्य नव्हते. कुटुंबियांनी मुलीचं लग्न दुसऱ्या युवकासोबत लावून दिल होते. पण लग्नानंतर 7 दिवसानंतर कुतबा ही एका विधीसाठी तिच्या पतीसह माहेरी आली होती. मात्र तेवढा पूर्ण काळ ती गजू शेखसोबत संपर्कातच होती. कुतबा घरी येताच गजू हा कार घेऊन तिथे पोहोचला. त्यानंतर त्या दोघांनीही कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

आपली मुलगी गजूसोबत पळून जात असल्याचे दिसताच तिचे वडील कुद्दुस हे त्यांच्या कारला थांबविण्यासाठी समोर जाऊन उभे राहिले. पण त्यांनी गाडी थांबवलीच नाही. गजूने गाडी थेट त्यांच्या अंगावर चालवली आणि त्यांना चिरडून तो पुढे गेला. यामुळे गंभीर जखमी झालेला कुद्दुस यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुद्दुस शेख यांच्या कुटुंबियांनी गजू याच्यावर अपहरण आणि खुनाचा आरोप लावत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी.. appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka