Dailyhunt
धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा.

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा.

खनौ (उत्तर प्रदेश): एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर नवरी दागिने घेऊन पळून गेल्याची घटना गोंडा येथे घडली होती. पोलिसांनी नवरी आणि तिच्या चार साथीदारांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

खरगुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. पाच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू सासरी आली होती. तिने सासरच्यांना जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून त्यांना बेशुद्ध केले आणि नंतर घरातील साहित्य घेऊन पळ काढला. या घटनेत नवरीला तिच्या कुटुंबीयांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी तक्रारीनंतर शोध सुरू केला असता आरोपी नवरीला पकडण्यात आले. तिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी सांगितलं की, ब्रृजभूषण पांडे याचे लखीमपूर येथील एका युवतीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झाले होते. 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणात काही पदार्थ मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केले. त्यानंतर तिने घरातील सर्व सामान घेऊन पळ काढला. घटनेपूर्वी वधूसोबत चार जण आले होते.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना त्यानंतर यश मिळाले. नवरी आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान नवरी आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

हनिमूनची तयार करत असतानाच नवरीची रवानगी कारागृहात…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

The post धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka