Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध.

धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध.

खनौ (उत्तर प्रदेश): आईने प्रियकरासोबत मिळून तिच्याच पोटच्या मुलीची हत्या केली. मृतदेह शेजारीच महिलेने प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवले. दारू पार्टी देखील केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

कैसरबागच्या खंडारी बाजारात राहणाऱ्या शाहरुखचे सुमारे 10 वर्षांपूर्वी रोशनी उर्फ नाजशी लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी सायनारा उर्फ सोना होती. रोशनी एक बार डान्सर आहे. ती 4 वर्षांपासून एका युवकासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने तिच्या मेहुणा, सासू आणि दोन वहिनींना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवले. तिने तिच्या पतीला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून लावले. त्यानंतर, ती तिच्या सासरच्या घरात तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

सोमवारी (ता. १४) रात्री 3 वाजताच्या सुमारास, रोशनीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की तिच्या पतीने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. ही माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले तेव्हा रोशनीने त्यांना सांगितले की, तिचा पती शाहरुख घरी आला होता. भांडण झालं आणि त्याने त्यांच्या मुलीची हत्या केली आणि पळून गेला. पण पोलिसांनी मुलीचा मृतदेह तपासल्यावर त्यांना वेगळाच संशय आला. कारण त्या मृतदेहातून खूप दुर्गंध येत होता, त्यात कीडेही झाले होते. त्यामुळे ही हत्या 1-2 दिवसांपूर्वीच ही हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांना रोशनी आणि तिचा प्रियकर उदित यांच्यावर संशय आला.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा रोशनीचा प्रियकर उदित जयस्वाल याने गुन्हा कबूल केला. उदितने सांगितले की, रोशनीचा नवरा आणि कुटुंबियांचा त्यांच्या या नात्याला विरोध होता. योजनेनुसार, रोशनीचा मेहुणा, सासू आणि दोन्ही नणंदा यांना तुरुंगात पाठवण्यात आले. 13 जुलै रोजी रोशनी आणि तिचा प्रियकर उदितने त्यांची 7 वर्षांची मुलगी सायनारा हिचा गळा दाबून आणि तोंड दाबून हत्या केली. ती मृत पावल्यावर रोशनी तिच्या पोटावर चढली, त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तिने तिचा प्रियकर उदितच्या कपड्याने रक्त साफ केले. त्यानंतर तिने मुलीचा मृतदेह बेड बॉक्समध्ये ठेवला आणि आम्ही शरिरसंबंध ठेवले. मात्र जेव्हा दुर्गंध येऊ लागला तेव्हा तिने आणि उदितने मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि एसीसमोर ठेवला. त्यानंतर त्यांनी शरीरावर परफ्यूम स्प्रे करून वास कमी करण्याचा प्रयत्न केला आणि खोली फिनाईलने धुतली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या मृतदेहासमोरच दारूची पार्टी केली. त्यानंतर रोशनी आणि उदित यांनीही ड्रग्ज घेतले. दारू पिऊन ते झोपी गेले. रात्री जागे झाल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला.

डॉक्टरांच्या पॅनेलने रोशनीची मुलगी सोनाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. गुदमरल्यामुळे सोनाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला आहे. पोस्टमॉर्टमच्या 36 ते 48 तास आधी तिचा मृत्यू झाला. याचा अर्थ खून रविवारी सकाळी किंवा रात्री झाला होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी…

पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली 'जिवंत'…

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

The post धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka