Dailyhunt
धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे.

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे.

बेळगाव (कर्नाटक): नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरा विवाह करून पहिल्या नवऱ्याच्या घराजवळच संसार थाटला होता. पहिल्या नवऱ्याने रागातून दोघांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोकटनूर यल्लामवाडी (ता.

अथणी) येथे घडली आहे.

यासीन बागोडे (वय २१) व हीना कौसर (वय १९, रा. कोकटनूर) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हीनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हीना कौसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता. परंतु, दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर हीना कौसर हिचा प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला होता. हीना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळ संसार थाटला होता. त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी त्याने मटणाच्या दुकानातील हत्याराने हीना आणि यासीन या दोघांवर हल्ला केला. यासीनची आई अमिना बागोडे व मुस्ताक मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले. तेव्हा त्याने दोघांना मारहाण केली. त्यामध्ये यासीन बागोडे यांचे आई- वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मिरज येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान, घटनास्थळी ऐगळी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

प्रेम! युवकासह अल्पवयीन मुलीने सोबतच घेतला जगाचा निरोप…

The post धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka