Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार.

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार.

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील रीवा येथे एका महिलेवर तिच्या नवऱ्यासमोरच पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शंभरहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एका आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.

पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गूढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या भैरव बाबा डोंगराजवळ सोमवारी (ता. 21) युवा दाम्पत्य सहलीसाठी गेले होते. मंदिरापासून थोड्या लांबवरच्या ओढ्याजवळ ते गप्पा मारत बसले होते. आरोपी मद्यधुंद अवस्थेत तिथे आले आणि त्यांनी महिलेच्या नवऱ्याला मारहाण केली. त्याला धरून ठेवले आणि महिलेवर आळीपाळीनं एक तास बलात्कार केला. पीडीत महिला व पतीने सुटका करून घेतल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेतले. एकाने गुन्हा कबूल केला आहे. आरोपीनं इतर चार साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली आहेत. त्या आरोपीला अटक करून पोलिस इतर चौघांचा शोध घेत आहेत.

आरोपींनी घटनेबाबत तयार केलेल्या व्हिडिओचा शोध पोलिस घेत आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पीडित महिला आणि पतीला तिथे सोडून निघून गेले. पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करू आणि जीवे मारू अशी धमकीही त्यांनी दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोठी बातमी! बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात…

मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…

संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

The post धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka