Dailyhunt
धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र.

धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र.

भोपाळ (मध्य प्रदेश): राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पतीच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, 'सात जन्मांचे साथ आहे,' ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला.

शिवाय, पतीच्या हत्येनंतर तिने प्रियकरासोबत रात्र घालवल्याची माहिती पुढे आली आहे.

सोनम घटनेच्या 10 किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या समोरच झाली होती. 21 मे रोजी सर्व आरोपी गुवाहाटीला आले होते आणि सोनमच्या ‘होम स्टे’ जवळच्या हॉटेलमध्ये थांबले होते. 23 मे रोजी हत्या करून ते परतले, तर सोनमही त्याच दिवशी गुवाहाटीहून इंदूरला रेल्वेने परतली. 25 मे रोजी इंदूरला पोहोचल्यावर तिने तिचा प्रियकर राज कुशवाहा याची भेट घेतली आणि एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत थांबली. त्यानंतर एका ड्रायव्हरने तिला बनारस येथे सोडले आणि वाराणसीहून सोनम बसने गाझीपूरला गेली. हत्येनंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. ज्यामुळे सोनमवर पोलिसांचा संशय बळावला.

शिलॉंग पोलिसांना सुमारे 42 सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. आरोपींनी गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेरील दुकानातून शस्त्रे खरेदी केली होती. आरोपी रेल्वेने गुवाहाटीला पोहोचले होते. पोलिसांनी सांगितले की, सोनम केवळ पतीच्या हत्येसाठीच तेथे आली होती आणि लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनंतर तिने हत्येचा कट रचला. हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, “सात जन्मांचे साथ आहे,” ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. हत्येनंतर सर्व आरोपी 11 किलोमीटर दूर जाऊन भेटले होते. राजा रघुवंशीला मार्गातून काढून राजसोबत राहणे हेच या हत्येमागचे मुख्य कारण होते.

मेघालय पोलिसांनी 50 किलोमीटर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा आणि सोनम दिसत होते. त्यांच्या आसपास तीन मुलेही दिसत होती. पोलिसांनी परिसरातील सर्व सक्रिय नंबर तपासले, ज्यात तीन नंबर इंदूरमध्ये सक्रिय आढळले. इंदूरमध्ये सुपारी किलरला अटक केल्यानंतर पोलिस मुख्य आरोपी राज कुशवाहापर्यंत पोहोचले. यानंतर सोनमला वाटले की आता लपून उपयोग नाही, म्हणून तिने आत्मसमर्पन केले.

सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…

राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…

नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…

हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

The post धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka