Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव.

धक्कादायक! पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा गेला जीव.

पाटणा (बिहार): शहरातील पोलिस वसाहतीत एका युवकाने त्याच्या पोलिस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केली. त्यासोबतच २ मुले आणि सासूचा गळा दाबला आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे.

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये झाली होती. दोघांच्या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. नीतूने बिहार पोलिस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी केली. २०१५ ला तिला यश मिळाले. कॉन्स्टेबल बनल्यानंतर २०१९ मध्ये नीतूने जानेवारीत पंकजसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना २ मुले झाली. सुरुवातीला नीतूची पोस्टिंग नवगछिया येथे होती. त्यानंतर भागलपूर एसएसपी कार्यालयात बदली झाली.

सरकारी नोकरीमुळे कॉन्स्टेंबल नीतू कुटुंबासह पोलिस वसाहतीत राहायला आली. पंकज, २ मुले, नीतू आणि त्याची सासू राहत होते. नीतूचा नवरा पंकज एका बुटाच्या दुकानात काम करत होता. अनैतिक संबंधांवरून पंकज आणि नीतू यांच्यात भांडण होऊ लागली. नीतूचे अन्य पुरुषाशी संबंध आहेत असे पंकजला वाटत होते.

दूधवाल्याने मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहिले आणि त्याने तातडीने शेजाऱ्यांना कळवले. पोलिसांनी टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी काही मृतदेह बेडवर तर काही जमिनीवर पडल्याचे पाहिले. पंकजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सोमवारी रात्री नीतू आणि पंकजमध्ये घराबाहेर काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून पंकजने आत्महत्येपूर्वी पत्नी, २ मुले आणि सासूचा खून केल्याचे कबुल केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…

प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला…

अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka