Dailyhunt
धक्कादायक! प्रियकराला संपवले आणि गर्लफ्रेंड बनण्यास नकार देताच.

धक्कादायक! प्रियकराला संपवले आणि गर्लफ्रेंड बनण्यास नकार देताच.

खनौ (उत्तर प्रदेश) : अंमली पदार्थाच्या तस्करीतून होणाऱ्या कमाईच्या वाटणीवरून दोन जणांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या वादातून प्रियकर लाल सिंह आणि त्याची प्रेयसी प्रियांकाची हत्या करण्यात आली आहे.

गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अंमली पदार्थांची तस्करी करणारा कुख्यात तस्कर लाल सिंहची 15 ऑक्टोबर रोजी नगर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत हत्या करण्यात आली. त्यानंतर चार दिवसांनी 19 ऑक्टोबरला त्याची प्रेयसी प्रियांकाची हत्या झाली. हत्येनंतर प्रियांकाचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. या हत्या लाल सिंहच्या साथीदारांनी केल्या आहेत. तस्करीतून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल, काडतुसं आणि मोटरसायकल जप्त केली आहे.

15 ऑक्टोबरला सिव्हिल लाइन परिसरात रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला होता. त्यावेळी मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. पोलीस तपास सुरू असताना 6 नोव्हेंबरला परमात्मा प्रसाद नावाच्या व्यक्तीने हा बेवारस मृतदेह त्याचा मुलगा लाल सिंहचा असल्याचा दावा केला होता. मग पोलिसांनी परमात्मा प्रसादच्या तक्रारीवरून लंबू, गुड्डू आणि टिटू यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, लाल सिंहच्या नेतृत्वात ओडिशातून ते अंमली पदार्थ मागवून विकत होते. त्यानंतर एकूण कमाई चार जणात वाटून घेत. पण गेल्या काही दिवसांपूर्वी या वाटणीवरून वाद झाले होते. त्यानंतर लाल सिंहने आरोपी गुड्डूचा सुमारे 60 लाख रुपयांचा माल नोएडा पोलिसांना पकडून दिला. याचा बदला घेण्यासाठी लंबू, गुड्डू आणि नईमने लाल सिंह आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. आम्ही केवळ लाल सिंहची नव्हे तर त्याची प्रेयसी प्रियांका हिची देखील हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. कारण, तिने गर्लफ्रेंड बनण्यास नकार दिला होता. पोलीस चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस स्टेशनच्या बाथरूमधील शारिरीक संबंधाचा Video व्हायरल…

Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…

धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…

अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; 'वहिनी तुम्ही खूप हॉट…' अन् रंगेहात सापडला…

The post धक्कादायक! प्रियकराला संपवले आणि गर्लफ्रेंड बनण्यास नकार देताच… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka