Dailyhunt
धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून.

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून.

पुणे: प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये घडली आहे. मृत महिला मुलीसोबत राहत होती. 1 जानेवारी 2024 रोजी महिलेच्या पतीचे निधन झाले होते.

मृत महिलेच्या मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच महिन्यात त्या मुलीने आई आणि वडिलांना गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पाषणच्या सूस रोडच्या माउंटवर्ट अल्टसी सोसाइटीमध्ये वर्षा क्षीरसागर (वय 58) मुलगी मृण्मयी क्षीरसागर (वय 22) हिच्यासोबत राहत होती. एक जानेवारी रोजी मृण्मयीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिने नोकरी सोडली होती. सात महिन्याआधी मृण्मयीची डेटिंग अॅपद्वारा शिवांशू दयाराम गुप्ता (वय 23, रा. येरवडा) याच्यासोबत ओळख झाली होती. पण, काही महिन्यापूर्वी याबाबत शिवांशू डिलिव्हरी बॉय असल्याचे मृण्मयीला समजले होते.

शिवांशु दयाराम गुप्ता हा नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. नोकरी न मिळाल्यामुळे त्याने डिलिव्हरी बॉयचे काम सुरु केले. डेटिंग अॅपवर त्याची आणि मृण्मयीची ओळख झाली होती. पण मृण्मयीची आई या नात्याच्या विरोधात होती. शिवांशुची नोकरी आणि आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तिने मृण्मयीला या नात्यातून बाहेर येण्याचा सल्ला दिला होता. वडिलांना गमावलेल्या मृण्मयीने आईचे ऐकले ाणि शिवांशुसोबत ब्रेअकअप केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाराज प्रियकर शिवांशु गुप्ता एका रात्री मृण्मयीच्या घरी पोहचला. आई त्याला ओळखत होती, तिने त्याला घरात घेतले. घरात गेल्यानंतर शिवांशु गुप्ता याने लग्नासाठी वर्षा क्षीरसागर यांना मनवण्याचा प्रयत्न केला. पण वर्षा यांनी त्याचे ऐकले नाही. त्यानंतर त्याने रागाच्या भरात बेल्टने वर्षा यांचा गळा आवळून खून केला. वर्षा यांचा खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मृण्मयीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. आरोपी खून केल्यानंतर घरी जाऊन लपला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

The post धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka