Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या.

धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या.

बुलढाणा : संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी (वय 8) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. क्षुल्लक कारणातून वाद झाल्याने सासरा नारायण गायकी याने सून अश्विनी आणि नातू समर्थ यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. अश्विनी ह्या गर्भवती होत्या, हे सर्व माहित असताना सासरा नारायण गायकीने दोघांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

दोघांवर गंभीर वार केल्यानंतर 8 वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली होती. अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे.

The post धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka