Dailyhunt
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर.

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर.

हमदाबाद (गुजरात): शरीर संबंधानंतर रक्तस्राव सुरु झाल्यानंतर युवतीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. युवतीला उपचारासाठी डॉक्टरांकडे न्यायचे सोडून तिचा प्रियकर इंटरनेटवर उपाय शोधत बसला. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव आणि वेदनांमुळे युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडली आहे.

मृत युवती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी 26 वर्षांच्या युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

२३ सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवल्यावर युवतीला प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला होता. यानंतर घाबरलेल्या प्रियकराने तिला डॉक्टरांकडे न घेऊन जाता ऑनलाइन उपचार शोधण्यात वेळ वाया घालवत राहिला. यामुळे युवतीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तस्त्राव झाल्याचे पाहूनही आरोपीने युवतीसोबत पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. जलालपूर पोलिसांनी प्रियकरावर सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवसारीचे पोलिस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, ‘फॉरेन्सिक अहवालात युवतीचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे झाल्याचे पुढे आले आहे. युवकाने १०८ किंवा वैद्यकीय मदतीवर कॉल करण्याऐवजी त्याने मित्रांशी संपर्क साधला व त्यांची वाट पाहिल्यानंतर युवतीला खासगी वाहनातून दवाखान्यात हलवले. युवतीला आयव्ही फ्लुइड, रक्त व औषधांसह तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता.

शवविच्छेदन अहवालात युवतीच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत युवती ही नवसारी येथील नर्सिंग कोर्सच्या प्रथम वर्षात शिकत होती. तीन वर्षांपूर्वी ती आरोपीला पहिल्यांदा भेटली होती. दोन वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. सुमारे सात महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले होते. दोघांनी २३ सप्टेंबरला खासगी वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. या साठी त्याने हॉटेलमधील खोली बूक केली होती. या ठिकाणी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले.

युवतीच्या गुप्तांगातून अति रक्तस्त्राव होऊ लागला. हे माहिती असताना देखील आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. रक्तस्त्राव होत असतानाही त्याने हॉटेलमध्ये ६० ते ९० मिनिटे घालवली. यानंतर तिला दवाखान्यात नेले. मात्र, दुपारी सव्वादोन वाजता रुग्णालयाने युवतीला मृत घोषित केले. हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी पुरावे नष्ट करण्यासाठी युवकाने रक्ताचे डाग साफ केले. स्थानिक न्यायालयाने आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…

अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…

The post धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka