Dailyhunt
दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे.

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे.

खनौ (उत्तर प्रदेश): मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना पिलीभीतमध्ये घडली आहे. पोलिस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या पत्नीशी लहान भावाचे अनैतिक संबंध सुरू होते. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मोठ्या भावाचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या केल्याची कबुली लहान भावाने दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

पिलीभीतमधील न्यूरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाहरूआ कॉलनीमध्ये राहणारे स्वप्न घोष (वय ४०) त्यांची आई प्रताशी घोष यांच्यासोबत गावातल्याच मंदिरात राहत होते. मंदिरात राहून ते देवाची सेवा करत असत. त्याचवेळी त्यांचा धाकटा भाऊ आणि पत्नी घरी राहत असत. त्याचा छोट्या भावाने फायदा घेतला आणि वहिनीशी अनैतिक संबंध सुरू केले. मोठ्या भावाला ही गोष्ट समजल्यावर लहान भावाने मोठ्या भावाचा काटा काढायचे ठरवले. गुरुवारी (17 ऑक्टोबर) रात्री स्वप्न घोष आईसोबत जेवण करून मंदिरात झोपायला गेला. मध्यरात्री त्याच्या आईला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांचा मोठा मुलगा स्वप्न घोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आईचा आवाज ऐकून शेजारीपाजारीही आले.

स्वप्न घोष यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. पोलिसांना त्याबाबत कळवण्यात आले. पोलिस ठाण्याचे अधिकारी अशोक पाल तिथे पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीवर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे. हत्येसाठी वापरलेलं हत्यारही हस्तगत करण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…

वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…

The post दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka