Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री.

दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री.

पाटणा (बिहार) : पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एक व्यक्ती नोकरीनिमित्त बाहेरगावी असताना पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळे आणि दोघांनी घरातून पळ काढला. पण, एका रात्री घरातून पळून जाताना दागदागिने आणि पैसा घेऊन गेले आहेत.

बिहाच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील गौनाहा भागात ही घटना घडली आहे. श्रीवास्तव कुटुंबातील सुतारकाम करत असलेल्या रोहित श्रीवास्तव याचे रामनगर भागात राहणाऱ्या मुलीशी लग्न झाले होते. पुढे त्यांना एक मुलगी झाली. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी रोहित याने कामानिमित्त नेपाळमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर त्याला काम मिळाले व तो कुटुंबासाठी पैसेही पाठवू लागला.

रोहित याचा मामेभाऊ चंदन त्यांच्या घरी येऊ लागला होता. चंदन आणि रोहितची पत्नी यांच्यात पुढे प्रेमसंबंध जुळले होते. त्यामुळे चंदन सातत्याने त्यांच्या घरी येत असे व अनेक दिवस राहत असे. चंदन व रोहितची पत्नी यांनी अखेर एक दिवस घरातून पळून जाण्याचा कट केला. रोहितची पत्नी माहेरी निघून गेली. तिने मुलीलाही सोबत नेले होते. त्यानंतर दोघेही पळून गेले.

दीरासोबत घरातून पळून जाताना रोहितच्या पत्नीने घरातून दागिने व दीड लाख रुपयेही नेले. घडलेला प्रकार समजल्यावर नेपाळहून रोहित परत आला आणि त्याने गुरुवारी (ता. 24) पोलिसात तक्रार दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…

वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…

The post दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka