Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन्ही मृतदेहांची ओळख पटली; प्रेमप्रकरणातून हत्या; चौघांना अटक.

दोन्ही मृतदेहांची ओळख पटली; प्रेमप्रकरणातून हत्या; चौघांना अटक.

वतमाळ: दिग्रस तालुक्यातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात तीन दिवसांपूर्वी महिला व पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान दोन्ही मृतांची ओळख पटली आहे.

प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

वर्षा धनराज गिरे (रा. उमरी बु. ता. मानोरा जि. वाशिम), आकाश विलास बल्हाळ (रा. वाई गोस्था ता. मानोरा जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. वर्षा व आकाश हे उस तोडणीचे काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघे 29 मार्च रोजी घरातून पळून गेले होते. दरम्यान, 7 एप्रिल रोजी दिग्रस वनविभाग क्षेत्रातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान या प्रकरणी दोन्ही मृतांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांची कसुन चौकशी सुरु केली होती.

दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिग्रस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिली.

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…

शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

प्रेमकहाणीचा 'एक दुजे के लिए' स्टाईलने झाला शेवट…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka