Dailyhunt
एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप.

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप.

सोलापूर : एकतर्फी प्रेमातून नवरीने स्वतःच्या लग्नाच्याच दिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील दोन युवकांनी नवरीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात व्हायरल करु आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवू अशी धमकी दिली आहे.

सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक त्रास देत असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यासोबत आपली लग्न पत्रिकाही जोडली होती. युवतीच्या लग्नाच्या दिवशी येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय, कोणीच माझं काही करु शकत नाही, अशी धमकी युवकाने सालियाला दिली होती.

सालिया शेख हिने युवकांविरोधात 15 ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता. त्यामध्ये तिने म्हटले होते की, ‘सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे दोघेही असतील. संबंधित युवकांकडून युवतीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले गेले. युवतीचे अश्लील फोटो एडिट करून संबधित युवकांनी होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याचा आरोप केला. अखेर लग्न मोडल्याच्या धास्तीने युवतीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka