Dailyhunt
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली.

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली.

पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत.

लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राममधून शॉपिंग करताना तिला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस काजलला मुझफ्फरपूरमध्ये आणल्यानंतर न्यायालयात हजर करणार आहेत. त्यानंतर ती पळून जाण्याचं कारण स्पष्ट होईल. मुझफ्फरपूरहून न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या आनंद विहार सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून हे नवविवाहित दाम्पत्य प्रवास करत होते. एसी डब्यात बी 4च्या 43 आणि 45 क्रमांकाच्या सीटवर दोघे बसले होते. किशनगंज स्थानकावर एक्स्प्रेस बराच वेळ थांबली. तेव्हा काजल वॉशरूमला गेली. स्थानकातून एक्स्प्रेस निघाली तरी ती पुन्हा जागेवर आलीच नव्हती. प्रिन्सने वॉशरूमपासून आजूबाजूच्या डब्यांमध्ये तिची चौकशी केली. संपूर्ण एक्स्प्रेममध्ये शोधूनही ती सापडली नाही. मग त्याने रेल्वे अधिकाऱ्यांची मदत घेऊन याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काजलने गुरुग्राममध्ये आपला मोबाईल बंद करून त्यातील जुना सीमकार्ड काढला आणि नवीन सीमकार्ड सुरू केला. त्यानंतर ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आणि पोलिसांनी तिचं लोकेशन तपासले. आता ती पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, विद्युत विभागात कार्यरत असलेल्या प्रिन्स कुमार याचं फेब्रुवारी महिन्यात मधुबनी जिल्ह्यातील जयनगरची निवासी असलेल्या काजलशी लग्न झाले होते. लग्नानंतर हनीमूनसाठी रेल्वेतून जात असताना काजल बेपत्ता झाली होती.

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का.

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म.

बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह.

The post हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka