Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या.

हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या.

बंगळुरू (कर्नाटक): पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीरावर तब्बल चाकूने १७ वार केले आहेत.

मृत महिलेचे नाव हरिनी (वय ३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (वय २५) आहे.

आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत प्रेमसंबंध होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून,या आणि प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हरिनी आणि यश एका जत्रेत भेटले होते. यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. यादरम्यान महिलेचा पती दासे गौडाला तिच्यावर संशय येऊ लागला. त्याने हरिनीचा फोन तपासला असता, त्याला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर दासे गौडाने हरिनीला घरात कोंडून ठेवले होते.

दरम्यान, प्रियकर यश हरिणीशी संपर्क साधू न शकल्याने वेडा झाला होता. म्हणूनच त्याने तिला शोधून मारण्याचा निर्णय घेतला. ६ जून रोजी अनेक दिवसांनंतर दोघांचे बोलणे झाले, त्याने तिला ओयो हॉटेलमध्ये बोलावले. तिथे दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले. पण त्यानंतर यशने हरिनीची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांसमोर आरोपीने कबूल केले की, हरिनी त्याच्यापासून दूर राहिल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील 'रुबी हॉल'मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…

प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी…

सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…

नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka