Dailyhunt
हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या.

हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या.

मुंबई: आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या आठ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करत आहेत.

आत्महत्या केलेला मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. तो वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. परंतु, आईने त्याचे म्हणणे न ऐकल्याने या मुलाने रात्री सर्वजण झोपले असताना अनाथाश्रमातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. भाईंदरच्या उत्तन परिसरातील ‘सेवा कुटीर’ अनाथाश्रमात हा प्रकार घडला. तीन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षांच्या मुलाला या अनाथाश्रमात आणण्यात आले होते. या मुलाच्या आईने दुसरे लग्न केले होते. त्यामुळे तिने आपल्या मुलाला या अनाथाश्रमात ठेवले होते. ती अधुनमधून मुलाला भेटण्यासाठी अनाथाश्रमात यायची. त्याला भेटून आई परत आपल्या नव्या घरी जायची. मात्र, प्रत्येकवेळी हा मुलगा आईला घरी घेऊन जाण्यासाठी मागे लागायचा. ‘मला तुझ्याजवळ राहायचे आहे, इथे राहायचे नाही ‘, असे सांगायचा आणि रडायचा.

गेल्या महिन्यातही या मुलाची आई अनाथाश्रमात भेटायला आली होती. तेव्हादेखील या लहान मुलाने आईला घरी घेऊन चल, असे म्हणत होता. आई नेहमीप्रमाणे त्याला भेटून अनाथाश्रमातून आपल्या घरी निघून गेली. त्यामुळे हा लहान मुलगा निराश झाला होता. सोमवारी रात्री अनाथाश्रमातील सर्वजण झोपी गेल्यानंतर या मुलाने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर हा मुलगा कोणाच्या नजरेस पडला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली, तेव्हा त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…

हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…

The post हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka