रांची (झारखंड) : नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर बापाने सहा महिन्यांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन जोरात जमिनीवर आदळले. या घटनेत चिमुकल्याचा जीव गेल्याची थरकाप उडवणारी घटना गोड्डामध्ये घडली आहे.
गोड्डा जिल्ह्यातील हनवारा पोलीस स्टेशन हद्दीतील नरोत्तमपूर गावात ही घटना गढली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापलेल्या बापाने आपल्या 6 महिन्यांच्या नवजात मुलाला जमिनीवर आपटल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हनवारा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी वडिलांना अटक केली आहे.
नवजात बालकाची आई नूतन देवी यांनी सांगितले, ‘पती पंकज मंडल हा हनवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोत्तमपूर येथील सासरच्या घरी आला होता. त्याला मला आपल्यासोबत न्यायचे होते. मात्र दारू पिऊन तो मला मारहाण करत असायचा. यासाठी मी त्याच्यासोबत जायला तयार नव्हते. या नकारामुळे पतीचा राग अनावर झाला. त्याने 6 महिन्यांच्या मुलाला उचललं आणि रागाच्या भरात त्याला जमिनीवर जोरात फेकले. त्यामुळे चिमुकल्याला जीव गेला.’ दरम्यान, घटनेनंतर आरोपी पिता पळून जाऊ लागला पण त्याला पोलिसांनी पकडलं. गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपी वडील पंकज मंडल याला अटक करून तपास सुरू केला.
दरम्यान, आरोपी वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच महागामाचे एसडीपीओ चंद्रशेखर आझाद घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची कसून चौकशी सुरू केली आहे.
हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…
हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या…
The post हृदयद्रावक! चिमुकल्याला आईसमोरच जमिनीवर जोरात फेकले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

