Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू.

हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू.

त्रपती संभाजीनगर : आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहात असून, त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र, पाण्याचे पातेले अंगावर पडल्याने नुरेना गंभीर भाजली. आई-वडिलांनी तिला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

The post हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka