Dailyhunt
हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण.

हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चारचाकी गाडी आणि पैशाच्या हव्यासामुळे आशाराणी पवन भोसले (वय 22, रा. चिंचोलीकाटी) या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गरोदर असलेल्या आशाराणी हिने मंगळवारी (ता. 3) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे अवघ्या तीन वर्षांची मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गरोदर होत्या. आशाराणी यांचा 2019 मध्ये पवन भोसले याच्या सोबत विवाह झाला होता. विशेष म्हणजे आशाराणीच्या बहिणीचा विवाहही पवनच्या भावाशी झाला होता.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत आशाराणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पती पवन भोसले तिला गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. पैसे न आणल्यामुळे तिच्यावर सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. सासू-सासऱ्यांकडूनही 'स्वयंपाक नीट येत नाही', 'घरात इज्जत नाही' अशी टोमणे मारत तिला त्रास दिला जात होता. 2024 मध्ये तिला मारहाण करून माहेरी पाठवण्यात आले होते. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राने पती-पत्नीचे समुपदेशन केले होते. मात्र, त्यानंतरही त्रास सुरुच राहिला आणि अखेर आशाराणीने जगाचा निरोप घेतला.’

दरम्यान, आशाराणीचे वडील नागराज डोणे यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…

धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…

शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

The post हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka