Dailyhunt
हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू.

हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू.

ळगाव: जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत जामनेर येथील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

पहूरजवळील काही अंतरावर एका केटीएम दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे आणि अजय, तर एकाची ओळख पटली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पहूर येथील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी जखमींना त्वरित उपचारांसाठी हलवले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर सरकारी रुग्णालय, पहूर सरकारी रुग्णालय आणि जळगाव सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस या भीषण अपघाताच्या पुढील कारणांचा आणि मालवाहू चालकाचा शोध घेत आहेत.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…

पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…

सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka