नांदेड: अयोध्यानगरीत राहणारा शुभम ठाकूर (वय २९) हा नेहमीप्रमाणे जिम करुन घरी परतला. घरी परतल्यावर त्याने पाणी प्यायले. मात्र, पाणी प्याल्यावर त्याला अचानक अस्वस्थ वाटले आणि काही क्षणांतच कोसळला.
कुटुंबियांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
शुभम ठाकूर याचे नुकतेच लग्न ठरले होते. शुभमचा नुकताच साखरपुडा झाला होता. 3 ऑगस्ट रोजी विवाह होणार होता. मात्र नियतीने घात केला. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभम ठाकर हा व्यवसायाने बिल्डर होता. तसेच सामाजिक कामांमध्येही तो सक्रीय होता. त्याच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, शुभम ठाकूर याचे हृदयविकाराने निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. पण, त्याच्या निधनाने मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे.
हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…
हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…
प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…
हलक्या काळजाचे असाल तर यष्टिका आचार्य हिचा जिममधील Video पाहू नका…
अनैतिक संबंधातून जिम ट्रेनरने व्यावसायिकाच्या पत्नीची केली हत्या अन्…
The post हृदयद्रावक! जिम करुन घरी परतला अन् कोसळला; नुकताच साखरपुडा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

