Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ.

हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ.

बीड : लग्नाच्या १७ दिवस आधी पोलिसाने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन पंडित ढगे (वय २३) असे मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीडच्या परळीमध्ये रेल्वे पोलिस दलातील नितीन पंडित ढगे यांचे 7 मे रोजी लग्न ठरलं होतं. लग्नाची लगबग सुरू होती. ज्या घरात १७ दिवसांनंतर सनई-चौघडे वाजणार होते, अक्षता पडणार होत्या, तिथे आता फक्त आक्रोश होता. मूळचे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील असलेले नितीन ढगे सप्टेंबर २०२४ मध्येच पोलिस दलात रुजू झाले होते. नुकताच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती, ७ मे ही लग्नाची तारीख ठरली होती.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना नितीन यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन हे तीन दिवसांच्या सुटीसाठी गावी गेले होते. गुरुवारी सकाळीच ते सुटी संपवून परळीत आपल्या ड्युटीवर हजर झाले. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आईला फोन केला होता. मुलगा मनसोक्त गप्पा मारत होता, आज खूप वेळ गप्पा मारल्या होत्या. त्यामुळे आईचंही मन थोडं भरून आलं आणि तिलाही बरं वाटलं, पण तिला याची अजिबात कल्पना नव्हती की हा फोन शेवटचा असेल. समोरून मुलगा बोलत होता, अगदी मन भरून शेवटचं, जाता जाता फोनवर आईला म्हणाला काळजी घे गं. त्यानंतर फोन ठेवला आणि पुन्हा काही बोलणं झालंच नाही. थेट मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्याने आई पार कोसळून गेली आहे. ज्या मुलाशी आपण रात्री इतकं मनसोक्त गप्पा मारल्या त्या मुलाने इतकं भयंकर टोकाचं पाऊल उचलावं याचा तिला धक्का बसला.

परळीतील माधवबाग परिसरातील भाड्याच्या खोलीत नितीन यांचा शुक्रवारी सकाळी मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नितीन यांनी ही आत्महत्या नेमकी का केली? लग्नाचं स्वप्न डोळ्यासमोर असताना त्यांनी मृत्यूचा मार्ग का निवडला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. नितीन यांच्या अचानक जाण्याने पोलिस दलावरही शोककळा पसरली आहे. लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव छापलं होतं, त्याच मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ढगे कुटुंबावर आली आहे.

हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka