Dailyhunt
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी.

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी.

त्रपती संभाजीनगर : डॉक्टर असलेल्या महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या चिमुकल्याचा शोध सुरु आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पैठणमध्ये महिला डॉक्टरने सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात महिलेने सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेला दोन मुले असून, सहा वर्षाचा मोठा मुलगा असून सहा महिन्याचा छोटा मुलगा आहे. मंगळवारी (ता. १) संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला असून महिला डॉक्टरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून बाळाचा शोध सुरु आहे.

दरम्यान, मला चांगतपुरीला जायचे आहे असे म्हणत ही डॉक्टर महिला मंगळवारी रिक्षास्टँडवर आल्यानंतर रिक्षात बसली होती. पावणे सातच्या सुमारास पाटेगाव पुलावर रिक्षा आल्यावर पाणी बघायच्या निमित्ताने ती रिक्षातून उतरली. रिक्षातून खाली उतरताच गोदावरी पात्रात या महिलेने बाळासह उडी मारली. रिक्षावाल्याने आरडाओरडा करताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. पैठण पोलिसांना खबर कळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

महिलेनं बाळा सहीत गोदावरी पात्रात उडी मारल्याचे कळताच स्थानिक मच्छीमारांनी गोदावरी नदीत उतरत तब्बल दोन तास महिला व बाळाचा शोध घेतला. या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आले पण बाळाचा शोध लागला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

The post हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka