Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे.

हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे.

नाशिक: दिंडोरी शहरात शुक्रवारी (ता. ३) रात्री वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. गेट टुगेदरला गेलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट झाला आहे. कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला.

या दुर्दैवी अपघातात कारमधील सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावात शोककळा पसरली आहे.

दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कटुंब शुक्रवारी दिंडोरी शहरातील खासगी क्लासच्या गेट टुगेदर पार्टीला गेले होते. गेट टुगेदरची पार्टी आटोपून दरगोडे कुटुंब इर्टिगा कारने आपल्या निघाले होते. दरम्यान, शिवाजीनगर परिसरातून जात असताना त्यांची कार राजेंद्र राजे यांच्या विहिरीत जाऊ कोसळली. यात विद्यार्थी आणि पालक असे एकूण 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges

WhatsApp : 93712 69949

दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत अंधार आणि खोल पाणी होते. त्यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. त्यामुळे पोलिसांनी दोन हायड्रा क्रेन आणि गावातील पोहणाऱ्या व्यक्तींना बोलवून बचावकार्य केले. रात्री सव्वा बाराच्या सुमारास क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
१) रेश्मा सुनील दरगुडे वय २७
२) आशा अनिल दरगुडे वय ३२
३) खुशी/शृष्टीअनिल दरगुडे वय १४
४) श्रेयस अनिल दरगुड वय ११
५) राखी सुनील दरगुडे वय ११
६) श्रावणी अनिल दरगुडे ११
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे वय ७
८) माधुरी अनिल दरगुडे वय १३
९) सुनील दत्तू दरगुडे वय ३२

दरम्यान, घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असून या गाडीत तीन ते चार लहान मुले असल्याची देखील माहिती आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू असताना घटनास्थळावर मोठा जमाव जमला होता. तर या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…

नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka