Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी.

हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी.

नाशिक: एका नवविवाहित दांपत्याचा अपघातानंतर होरपळून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नरच्या पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने सगळेच सुन्न झाले आहेत.

सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्यामुळे एका नवदाम्पत्यासह तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक महिला बाहेर फेकली गेल्याने जागीच ठार झाली. अवघ्या महिनाभरापूर्वीच शुभम आणि रिंकू या जोडप्याचा विवाह झाला होता.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पंचाळे येथील मोरे, गांगुर्डे आणि नवले कुटुंबातील सदस्य पाथरे येथे नातेवाईकांकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून आनंदाने घरी परतत असताना, गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावर समोरून येणाऱ्या कोंबडी खाद्याच्या ट्रकने त्यांच्या जीपला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहने उलटली आणि जीपच्या केबिनने अचानक पेट घेतला.

जीपच्या केबिनमध्ये चालक किरण मोरे (वय २३), शुभम नवले (वय २१) आणि त्याची पत्नी रिंकू नवले (वय १९) बसले होते. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे या तिघांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत या तिघांचाही कोळसा झाला होता. जीपच्या मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्यामुळे त्यांचे प्राण वाचले, मात्र या घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील मृत मीराबाई गांगुर्डे (वय ६८) या शुभमच्या आजी होत्या. या घटनेमुळे संपूर्ण पंचाळे गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात चारही मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) या आयशर टेम्पो (एमएच १४/एमटी ३८३९) चालकाविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांमध्ये शुभम गणेश नवले (वय २१) व रिंकू शुभम नवले (१९) हे नवविवाहित दाम्पत्य, त्यांची आजी मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८, सर्व रा. पंचाळे) व पीकअप चालक किरण रवींद्र मोरे (वय २३) यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka