मुंबई : पोलिस भरतीसाठी धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय, आणखी 6 उमेदवारांचीही प्रकृती खालवली. या सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
अक्षय बिहाडे (वय २५, रा. अमळनेर) मृत युवकाचे नाव आहे. नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'
अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील अक्षय मिलिंद बिहाडे हा युवक 27 जूनला पोलिस भरतीसाठी बालेगाव येथे गेला होता. 29 जूनला मैदानी चाचणीसाठी धावत असताना 3-4 किमीनंतर त्याला भोवळ आल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एकुलता एक मुलगा गमविल्याने आई-वडिलांनी टाहो फोडला. अक्षय हा प्रताप महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षाला होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. धुळे येथील प्रेम ठाकरे (वय 29) याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. पवन शिवाजी शिंदे (वय 25), अभिषेक शेटे (वय 24), सुमित किशोर आडतकर (वय 23), साहिल किशोर लवण (वय 19) यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर अमित गायकवाड याला उपचारानंतर डिस्चार्ज दिला आहे.
अक्षय बिऱ्हाडे याने नवी मुंबईतील बलेगाव कॅम्प येथे पोलिस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी होता. भारती ग्रुप नंबर 11 धावपट्टीवर धावत असताना अक्षय जमिनीवर कोसळला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. अक्षय 500 मीटर धावण्याआधीच जमिनीवर कोसळला होता. त्याच्यावर वेळेवर उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीला जाण्यापूर्वी घरातील सौम्य आहार हा चाचणी अगोदर घ्यावा. तसेच अतिउत्साही होऊन शारीरिक चाचणी देऊ नका. मन शांत प्रसन्न ठेवून शारीरिक चाचणीला सामोरे जा. जेणेकरून डिप्रेशनमध्ये न जाता उत्साहात तुम्ही तुमची चाचणी देऊ शकाल. शारीरिक चाचणी अगोदर तज्ञांकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक चाचणीसाठी जे प्रकार विचारणार आहेत त्याबाबत सराव करून घेणे देखील महत्त्वाचे आहे. पाणी प्यावे तसेच सकस आहार असावा. स्वतःची पूर्ण काळजी घ्या. ही केवळ परीक्षा आहे त्यामुळे सर सलामत तो पगडी पचास, हे नेहमी लक्षात ठेवा.
पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…
पोलिस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…
बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…
पोलिस भरतीबाबत निलेश लंके यांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी…
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…
महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

