Dailyhunt
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा.

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा.

मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे.

त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या घरी वरळी येथील निवासस्थानी दुचाकीने परतत होते. वाकोला ब्रीज, सांताक्रुज पूर्व परिसरात मांजाने त्यांचा गळा चिरला. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जाधव यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दरवर्षी नायलॉनच्या मांजामुळे राज्यात शेकडो अपघात घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जाधव देखील मांजाचे बळी ठरले आहेत.

kashmir

The post हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka