Dailyhunt
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू.

हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू.

केडगाव (पुणे): दौंड तालुक्यातील केडगाव येथील दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रस्ता ओलांडत असताना चालत जाणाऱ्या दोन्ही भावांना एकाच वेळी चिरडल्याची घटना घडली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील सह्याद्री पत्रा कंपनी जवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने चाललेल्या लाल रंगाच्या अज्ञात इनोव्हा गाडीने दोन भावांना चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास शेळके (वय ५८) व पांडुरंग शेळके (वय ५५, राहणार केडगाव देशमुख मळा ता. दौंड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. कामानिमित्त दोघे पुणे सोलापूर हायवे वरून रस्ता ओलांडताना रात्री रविवारी (ता. १०) रात्री ८.०० वाजता अपघात घडला.

इनोव्हा कारने अपघातानंतर दोघांना शंभर फुटावून अधिक लांब पर्यंत ओढत नेले. अपघातानंतर चालक थांबला नाही. घटनास्थळी ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत त्यांना यवत ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांना त्या ठिकाणी मृत म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. यवत पोलिस व महामार्ग पोलिस चौफुला यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कैलास शेळके यांच्या पाठीमागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे. पांडुरंग शेळके यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग शेळके हे नागेश्वर विकास सोसायटी केडगावचे सचिव गणेश शेळके यांचे वडील होत.

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला आल्या अन्…

हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…

The post हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka