Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह.

IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह.

वी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेत अधिकारी असणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह हॉस्टेलच्या रूममध्ये आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आयपीएस संतोष रस्तोगी यांची मुलगी अनिका (वय १९) लखनौच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठात (एलएलबी) तिसऱ्या वर्षात ती शिकत होती.

विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये खोलीत ती फरशीवर मृतावस्थेत आढळून आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिका हॉस्टेलमधील तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अनिका तिच्या खोलीत काल रात्री गेली होती. त्यानंतर कोणत्याच फोन कॉलला तिने उत्तर दिले नव्हते. यामुळे तिच्या मित्र मैत्रिणींनी तिच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर ती फरशीवर बेशुद्धावस्थेत आढळून आली. शिवाय, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

अनिका इतर विद्यार्थीनींसोबत क्लायंट काउन्सिलिंगमध्ये शनिवारी सायंकाळी सहभागी झाली होती. त्यानंतर जेवण करण्यासाठी ती गेली होती. जेवणानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास ती खोलीत परतली होती. तिची रुममेट दहाच्या सुमारास परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडत नसल्याने हॉस्टेलच्या मेट्रनला बोलावले त्यांनी जोरात धक्का देत दरवाजा उघडला. तर अनिका फरशीवर पडल्याचे दिसून आले.

विधी विद्यापीठाचे प्रवक्ते शशांक शेखर यांनी सांगितले, अनिका हिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा अशी शक्यता वाटते. ती एक हुशार विद्यार्थीनी होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहेत. तिचे आई वडील नोएडाहून दाखल झाले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…

धक्कादायक! डॉक्टर मोबाईलमध्ये पाहून करत होता शस्त्रक्रिया अन्…

मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka