Dailyhunt
जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण.

जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण.

ळगाव : जळगाव जिल्ह्यातील गायत्री पाटील प्रकरणाने खळबळ उडाली होती. नोकरीचं आमिष दाखवून अपहरण, दोन लाखांत विक्री, आणि बळजबरीने विवाह केला अशा आरोपांनी सुरू झालेल्या या कथेला आता तपासात नवं वळण मिळालं आहे.

पोलिसांनी परभणी येथून गायत्रीला ताब्यात घेतलं असून, ती फसवणूक करणाऱ्या बनावट विवाह रॅकेटचा भाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावमधील युवतीची विक्री आणि बळजबरीने विवाह तसेच तिच्या पित्याची आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले आहे.

धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…

जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात गायत्री पाटील आणि तिची आई मनीषा पाटील हिची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडून चौकशी करण्यात आली. गायत्री पाटील हिचे अपहरण विक्री आणि बळजबरी विवाह, त्यानंतर गायत्रीचे वडील भैया पाटील यांची आत्महत्या या घटनेची वस्तुस्थिती वेगळी आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

लग्नाचा बनाव करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये गायत्रीचाही सहभाग आहे. पुणे, परभणी, कोल्हापूर आणि जळगाव या चार ठिकाणी विवाह करून गायत्री आणि तिच्यासोबत असलेल्या टोळीकडून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. गायत्री पाटील हिने पुणे, परभणी, कोल्हापूर आणि जळगाव येथे बनावट विवाह करून आर्थिक फसवणूक केली आहे. नागरिकांची फसवणूक करणारी ही एक मोठी टोळी आहे आणि यांच्याविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

गायत्रीच्या अपहरणानंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. मात्र, तपासातून समोर आले की, गायत्री स्वतःच अशा बनावट विवाह टोळीत सहभागी होती. पोलिसांनी तिची आई मनीषा पाटील हिला अटक केली असून, दोघींसह आणखी दोन जणांवर बनावट लग्न लावल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्रीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी तिला देखील अटक केली जाणार आहे.

ज्या प्रकरणात सुरुवातीला गायत्री पाटील पीडित म्हणून समोर आली होती, त्याच प्रकरणात तिच्यावर चार वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लग्न करून युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. आमच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. आम्ही निर्दोष आहोत. या प्रकरणात कोल्हापूरमधील लोकांनी आमची फसवणूक केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी आहे, असे मनीषा पाटील यांचे म्हणणे आहे.

गायत्रीला परभणीहून ताब्यात घेतल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तर तिच्या आईला चौकशीदरम्यान अटक झाली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या रॅकेटमध्ये अधिक आरोपी असण्याची शक्यता असून, सखोल तपास सुरू आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात भैया पाटील या निष्पाप बाबाचा मात्र बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! कुरिअर बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला…

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…

हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…

मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…

The post जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka