रांची (झारखंड): रांची पोलिस दलातल्या माजी कॉन्स्टेबल सरोजिनी लाकरा यांनी जिद्दीच्या जोरावर आयपीएस अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आदिवासी कुटुंबातील सरोजिनी लाकरा यांची जीवन कहाणी प्रेरणादायी आहे.
सरोजिनी यांच्या कौशल्याने तिचे प्रशिक्षक रॉबर्ट किस्पोटा यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी तिला स्पोर्ट्स अकादमीत घेतलं. तिला केवळ तज्ज्ञांचं मार्गदर्शनच नव्हे तर भोजन आणि निवास यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. किस्पोटा यांच्या मार्गदर्शनाखाली सरोजिनीने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तिच्या जिल्ह्याचे आणि झारखंड राज्याचं प्रतिनिधित्व केले आणि पदकं जिंकली. क्रीडा क्षेत्रातल्या विलक्षण कामगिरीने तिची पोलिस दलातल्या करिअरची दारे उघडली. क्रीडा कोट्यातून पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. त्यानंतर ती यशस्वी होत गेली. 100 मीटर अडथळ्यांची शर्यत, 100 बाय 400 मीटर रिले, उंच उडी, लांब उडी आणि हेप्टॅथलॉन यांसह अनेक क्रीडा प्रकारांत तिने पदकं मिळवली. सरोजिनी लाकरा यांनी सार्वजनिक सुरक्षिततेसाठी झोकून देऊन काम केले.
राज्य पोलिस दलात काम करत असतानाच त्यांचा भारतीय पोलिस सेवेत प्रवेश झाला. सध्या सरोजिनी लाकरा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सरोजिनी यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.
सुंदरतेसोबत हुशारी! कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी…
The post जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

