Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कारने पाठलाग; संधी मिळताच 'आप' नेत्याची गोळ्या झाडून हत्या.

कारने पाठलाग; संधी मिळताच 'आप' नेत्याची गोळ्या झाडून हत्या.

फिरोजपूरः कारमधून आलेल्या दोन संशयितांनी, आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून जाणाऱ्या गुरप्रीत सिंग नावाच्या एका स्थानिक आम आदमी पार्टीच्या नेत्याची अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली आहे.

पंजाब राज्यात फिरोजपूर जिल्ह्यातील ममडोट येथे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका नेत्याची अशाप्रकारे हत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीची ओळख पटली आहे. घटनेचा पुढील तपास चालू असून, पोलिस दोन्ही संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच एका नेत्याला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हत्येमुळे, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka