Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप.

कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप.

मुंबई: माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यावलयात कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महेश नवले याच्यावर, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी बुधवारी (ता.

२) रात्री नवलेला ताब्यात घेतले असून, या प्रकारणाचा पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी नवलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. पीडित मुलीची प्राथमिक जबानी नोंदवण्यात आली असून, आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.

महेश नवले हा एसएनडीटी कॉलेमध्ये कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचं पोलिसांनी सांगितले. याशिवाय तो चुनाभट्टी आणि सायन परिसरात स्वतंत्रपणे कराटे क्लासेसही चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रांबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

नवलेविरुद्ध यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा गैरप्रकाराची नोंद झाली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी चालू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka