Dailyhunt
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी.

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी.

वी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात गुरुवारी (ता. 21) दुपारी दहशतवाद्यांनी केलेले्या भ्याड हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले आहेत. करण सिंह यादव, गौतम कुमार, चंदन कुमार आणि रवि कुमार राणा अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत.

सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लष्कराने हुतात्मा जवानांची पार्थिव शरीरं कुटुंबीयांकडे पाठवली आहेत. या घटनेनंतर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित हृदयद्रावक गोष्टी समोर आल्या. हुतात्मांपैकी दोघांचा काही दिवसांनी विवाह होणार होता, तर दोघांचे सुखी संसार उधळले गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहेत.

सैनिक गौतम कुमारः
गौतम कुमार (वय २८, रा. शिवपूर आमपडाव, कोटद्वार, उत्तराखंड) हे 16 डिसेंबर रोजी ते रजा संपवून ड्युटीवर परतले होते. 11 मार्च 2024 रोजी त्यांचे लग्न होणार होते. गौतम यांचा मोठा भाऊ राहुल कुमार यांना 21 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता भावाच्या युनिटमधून हुतात्मा झाल्याचा फोन आला. या बातमीनंतर त्यांच्या घरात मोठा आक्रोश सुरू झाला.

करण सिंह यादव:
करण सिंह यादव (रा. चौबेपूर, भाऊपूर, कानपूर) यांच्या मागे आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. करण सिंहच्या पायाला गोळी लागल्याचा फोन गुरुवारी संध्याकाळी आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते हुतात्मा झाल्याची बातमी मिळाली. करण सिंह ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या कुटुंबीयांना शेवटचे भेटले होते. येत्या फेब्रुवारीमध्ये ते सुट्टी घेऊन घरी येणार होते; मात्र त्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना मिळाली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

चंदन कुमार:
चंदन कुमार (रा. नवादा, नरोमुरार) यांच्या मागे आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. एक भाऊ मोठा आहे तर एक लहान आहे. तीन भावांमध्ये चंदन मधले होते. चंदन 2017मध्ये सैन्यात भरती झाले होते. 18 महिन्यांपूर्वी बिहारमधील लखीसरायला त्यांचा विवाह झाला होता. चंदन अतिशय गरीब कुटुंबातले होते. लष्कराकडून रात्री 12.30च्या सुमारास आलेला फोन धाकटा भाऊ अभिनंदन यांनी घेतला आणि हुतात्मा झाल्याची बातमी मिळाली. आर्मी कॅम्पमधून आलेल्या या फोनवर कुटुंबीयांचा विश्वास बसला नाही. त्यानंतर अभिनंदन यांनी चार ते पाच वेळा फोन करून याबाबत शाहनिशा केली.

रविकुमार राणा:
रविकुमार राणा (वय २६, रा. किश्तवाड) हे सात वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच लग्नही होणार होते. त्यांचे पार्थिव किश्तवाडमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या भावी पत्नीला मानसिक धक्का बसला. रविकुमार राणा यांचे वडील शेतकरी आहेत. रवीला आणखी दोन भाऊ आहेत. त्यांचा मोठा भाऊही लष्करात कार्यरत असून ते सध्या पंजाबमध्ये आहेत.

Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…

लेहमध्ये झालेल्या दुर्घटनेत सातारचा जवान हुतात्मा…

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…

महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…

महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka