Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार.

कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार.

कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका मुख्याध्यापकानं शाळेतील अल्पवयीन माजी विद्यार्थिनीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. कागल) असे या संशयित मुख्याध्यापकाचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी आईची प्रकृती बिघडल्याने, तिच्या देखभालीसाठी ही अल्पवयीन मुलगी कोल्हापूरला आली होती. यावेळी संशयित मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे हा आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने घरी आला होता. यातून त्याने पीडित मुलीशी संपर्क वाढवला. ऑगस्ट २०२५ मध्ये संशयित दाभोळे हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. पुढे त्याने पीडितेला मुलाच्या फ्लॅटवर बोलावून घेतले आणि तिथेही तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्याने आईने मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. यावेळी मुलीने मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचे सांगितले. हे ऐकून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईने तात्काळ पोलिस अधीक्षक कार्यालय आणि महिला कक्षाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी चक्रे फिरवून मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याला मुरगूड (ता. कागल) येथून बेड्या ठोकल्या. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka