कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री घडली आहे. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होती. तेव्हा मार्केट यार्डच्या दिशेने रुळावरून तिघी चालत निघाल्या होत्या. त्यांना भरधाव कोयना एक्सप्रेसची धडक बसली. यात एक महिला रुळाच्या एका बाजूला आअणि दुसऱ्या महिला मुलीसह दुसऱ्या बाजूला पडली.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'रेल्वेच्या धडकेत दोन्ही महिलांचे चेहरे छिन्नविछिन्न झाले. तर लहान मुलीचाही जागीच मृत्यू झाला. रेल्वेला महिलांची धडक होताच रेल्वेचा वेग कमी करून ती काही अंतरावर थांबवली. त्यानंतर नागरिकही रुळाकडे आले. तेव्हा तिघींचे मृतदेह रुळाशेजारी पडल्याचे दिसून आले. रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, घटना जिथे घडली तिथून लोक ये जा करत असतात. दूर अंतरावरूनही रेल्वे दिसते. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात कसा घडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मृतांमधील एका महिलेचे वय ४० ते ४५ , तर दुसऱ्या महिलेचे वय २५ ते ३० आहे. लहान मुलगी १० ते १२ वर्षांची असून तिचा चेहरा ओळखण्यासारखा आहे. तिच्या चेहऱ्यावरून आता इतरांची ओळख पटवली जाणार आहे.
कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…
कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या…
कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…
कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

