पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (ता. ५) भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे.
शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी घराजवळ कोथरुडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याचे नाव समोर आले होते. मात्र, आता पहिल्यांदाच यामागचा मास्टरमाईंड समोर आले आहे. नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टरमाईंड असून अतिशय नियोजनबध्द रित्या पोळेकरसह दोन जणांना मोहोळ टोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली.
sharad-moholशरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक म्हणजे शरद मोहोळ याचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळ याच्याकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. पैशांच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये वाद उडाला होता.
जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची बाचाबाची झाली होती, त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचे गाव आहे, त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळ याने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकर याने शरद मोहोळची हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, आता ही हत्या वर्चस्ववादातून झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

